
वसईतील शिबिरात १४३ जणांचे रक्तदान
विरार, ता. २८ (बातमीदार) : चुळणे येथील जागृती सेवा संस्था आणि सरला ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमान वसईतील भाबोळा येथील किंग्ज डान्स ॲकॅडमी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जागृती सेवा संस्थेमार्फक आयोजित रक्तदान शिबिराचे हे १८ वे वर्ष होते. यात १६८ रक्तदात्यांनी सहभाग दिला. त्यापैकी १४३ रक्तदात्यांचे रक्त घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला वसईतील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर प्रदीप भवन पाठक हे अध्यक्ष व फातिमा माता चर्च, चुळणे येथील सहाय्यक धर्मगुरू फादर रॉनी डाबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रक्तदान शिबिर आयोजित करणे ही काळाची गरज आहे. रक्तदान करताना रक्तदात्याला त्याचे रक्त कोणत्या धर्माच्या व्यक्तीला जाईल याची कल्पना नसते. रक्तदान केल्याने शरिरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते, असे मत डॉक्टर प्रदीप भवन पाठक यांनी केले.