कांद्याच्या दरात घसरण सुरूच

कांद्याच्या दरात घसरण सुरूच

वाशी, ता. २९ (बातमीदार) ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे; पण येणाऱ्या मालाला उठाव नसल्याने बाजारभाव उतरले आहेत. त्यामुळे महिनाभरापूर्वी १३ ते १४ रुपये किलो दराने विकला जाणारा नवीन कांदा सध्या ८ ते १० रुपये किलोने विकला जात आहे.
एपीएमसीत डिसेंबर, जानेवारीत नवीन कांद्याची अधिक आवक होत असते; परंतु अवकाळी पावसाने उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे जुन्या साठवणुकीचा कांदा भिजल्याने खराब झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी बाहेर काढण्यात आला आहे. परिणामी, बाजारात काद्यांचे आवक वाढल्याने दर गडगडले आहेत. मंगळवारी बाजारात १२० गाड्या दाखल झाल्या; परंतु पुरवठ्याच्या तुलनेत उठाव कमी असल्याने दरात घसरण सुरूच आहे.
----------------------------------------------
सध्याचे बाजारातील दर
सध्या बाजारात मोठ्या आकाराचा कांदा ९ ते ११ रुपये किलो, तर एक आणि दोन नंबरचा कांदा ७ ते ९ रुपये किलो आणि पाल्याचा कांदा ३ ते ४ रुपये किलोने विक्री होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com