हृदयरोगग्रस्‍त महिलेला मिळाले जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हृदयरोगग्रस्‍त महिलेला मिळाले जीवदान
हृदयरोगग्रस्‍त महिलेला मिळाले जीवदान

हृदयरोगग्रस्‍त महिलेला मिळाले जीवदान

sakal_logo
By

हृदयरोगग्रस्‍त महिलेला मिळाले जीवदान
महाधमनीच्‍या समस्‍येवर यशस्‍वी शस्त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबईतील ७१ वर्षीय हृदयरोगग्रस्‍त महिलेवर केलेल्‍या यशस्‍वी शस्त्रक्रियेमुळे तिला जीवदान मिळाले आहे. हृदयातील एओर्टिक म्‍हणजे महाधमनीमधील समस्‍येमुळे या महिलेला श्वास घेण्यात अडचण, चक्कर येणे असा त्रास होत होता. वोक्हार्ट रुग्णालयात त्‍यांना दाखल केल्‍यानंतर काही तपासण्या करण्यात आल्‍या. त्‍यानंतर महाधमनीच्‍या समस्‍येवर ओपन हार्ट सर्जरी किंवा ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (तावी) करण्याचे सुचवण्यात आले. त्‍यावर रुग्णाने ओपन हार्ट सर्जरीचा पर्याय निवडला.
सुगंधा जाधव असे या महिलेचे नाव असून त्‍यांना ब्रोन्कियल अस्थमा आणि जुन्या टीबीच्या पार्श्वभूमीवर टाइप १ श्वसन निकामी झाल्याचे निदान झाले होते. त्‍यांच्‍या काही तपासण्या केल्यानंतर हृदयाच्या गंभीर एओर्टिक स्टेनोसिस या आजावर ओपन हार्ट सर्जरी केल्‍यानंतर त्‍यांना जीवदान मिळाले आहे.

असे झाले उपचार
१ कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. गुलशन रोहरा यांनी सांगितले की, रुग्णाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया ही एक धोक्याची घंटा होती.
२ महिलेचे वजन ३२ किलो, वय वर्ष ७१, यासह क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह फुफ्फुसाचा रोग (ब्रोन्कियल दमा) असे अनेक घटक होते.
३ ओपन हार्ट सर्जरी करण्यासाठी त्‍यांना तयार केले.
४ दोन आठवड्यांपूर्वीपासून नियोजन केले होते. रोगग्रस्त व्हॉल्व्ह बदलणे हे सर्वात मोठे आव्हान होते. मात्र, डॉक्टरांनी हे आव्हान यशस्‍वीरीत्‍या पेलले.

काय आहे तावी?
ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन याला तावी म्‍हणतात. ही एक प्रगत प्रक्रिया आहे. यामध्ये शस्त्रक्रियेशिवाय हृदयातील अरुंद व्हॉल्व्ह बदलला जातो.

एओर्टिक स्‍टेनोसिस म्‍हणजे काय?
एओर्टिक स्‍टेनोसिस म्‍हणजे महाधमनीच्‍या व्हॉल्व्हमध्‍ये समस्‍या उद्‌भवणे. महाधमनी ही एक मोठी, छडीच्या आकाराची असते. जी शरीरात ऑक्सिजन समृद्ध रक्त पोहोचवते. या धमनीतून वाहणार्‌या रक्‍त प्रवाहात अडथळा आल्‍यास अचानक हृदयविकाराने मृत्यू होऊ शकतो.

डॉक्टरांवरचा विश्वास जिंकला
डॉ. हनी सावला यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर शरीर तपासणीचा सल्ला देण्यात आला. जोखीम समजल्यावर मीच शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला. डॉक्टरांवर ठेवलेल्या विश्वासामुळे मी आज मोकळा श्वास घेत असल्‍याचे सुगंधा जाधव यांनी सांगितले.