खारटन रोड वाहतुकीसाठी बंद

खारटन रोड वाहतुकीसाठी बंद

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तसेच वाहतुकीसाठी खारटन रोड परिसरातील महत्त्‍वाचा रस्ता मानला जातो. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. याच रस्त्यावरील शीतला माता चौक येथील रस्त्याला सोमवारी रात्री उशिरा भगदाड पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन केंद्राच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जुन्या मलनिस्सारण चेंबर दुरुस्ती कामामुळेच खारटन परिसरातील रस्ता खचल्याचा दावा पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केला असून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. काम पूर्ण होईपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच ठाणे पश्चिम स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या बसगाड्यांना कळवा येथील क्रिकनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तसेच वाहतुकीसाठी खारटन रोड परिसरातील रस्ता महत्त्‍वाचा मानला जातो. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. मार्गावरून कळवा, साकेत, कशेळी, काल्हेर भागातील नागरिक दररोज कामानिमित्ताने बस आणि शेअर रिक्षाने प्रवास करतात. सोमवारी रात्री या मार्गावरील ठाणे कॉलेजजवळील शीतला माता चौक परिसरात रस्ता खचून त्याला मोठे भगदाड पडले. हा प्रकार पाहून स्थानिकांनी तात्काळ मार्गरोधक लावून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. या रस्त्याखाली असलेली मलनिस्सारणची वाहिनी खूप जुनी असून, परिसरात मलनिस्सारणाचे पाणी तुंबत होते. याबाबत तक्रारी येऊ लागल्याने पालिका अधिकाऱ्यांनी त्या परिसराची पाहणी केली होती.
-------------------------
अनर्थ टळला!
खारटन रस्त्यावरील मलनिस्सारण चेंबरची माती खचत असल्याने हा प्रकार घडत असल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. यानंतर पालिकेने चेंबर दुरुस्तीसह वाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले होते. रस्त्याखालील माती खचल्‍याने मोठे भगदाड पडले. या घटनेनंतर स्थानिकांनी या मार्गावरील वाहतूक बंद केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com