मारहाण प्रकरणी पाचजणांवर गुन्हा

मारहाण प्रकरणी पाचजणांवर गुन्हा

नवी मुंबई (वार्ताहर) : ऐरोली, सेक्टर-३ परिसरात गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांनी लावलेले बॅनर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने काढले होते. या प्रकारानंतर हळदणकरांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिक्रमण पथकातील कामगारांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी पाच जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ऐरोली विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे पथक ऐरोली परिसरातील विनापरवाना लावलेले बॅनर काढण्यासाठी २३ मार्च रोजी गेले होते. या वेळी ऐरोली विभाग कार्यालयाजवळ माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांच्या शुभेच्छा फलकांवरही कारवाई केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com