महाविकास आघाडीचा मुरबाडमध्ये मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीचा मुरबाडमध्ये मोर्चा
महाविकास आघाडीचा मुरबाडमध्ये मोर्चा

महाविकास आघाडीचा मुरबाडमध्ये मोर्चा

sakal_logo
By

मुरबाड, ता. २८ (बातमीदार) ः काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून मुरबाडमध्ये मंगळवारी (ता. २८) निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, काँग्रेसचे नेते दयांनद चोरघे, शिवसेनेचे मधुकर घुडे, रिपाइं सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुकाराम ठाकरे, चेतनसिंह पवार, राजाभाऊ सासे, संतोष विशे, संध्या कदम, रंजना शिंदे आदी मान्यवर मोर्चामध्ये उपस्थित होते होते.

मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली. तेथून मुख्य बाजारपेठ ते डॅा. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रमोद हिंदुराव, आरपीआय नेते रवींद्र चंदने, शिवसेनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष संतोष विशे, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन सिंह पवार यांनी भाषणे केली. राहुल गांधी यांची लोकनियुक्त खासदारकी रद्द करून देशाची लोकशाही संपवण्याचा घाट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घातला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी पुनर्स्थापित करून लोकशाही टिकवावी, ही मागणी राष्ट्रपतींकडे मुरबाड तहसीलदार यांच्यामार्फत करण्यात आली.