चाकूहल्ल्यात बिघडलेल्या स्वरयंत्रावर शस्त्रक्रिया

चाकूहल्ल्यात बिघडलेल्या स्वरयंत्रावर शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः प्राणघातक हल्ल्यात महिलेच्या स्वरयंत्राचे नुकसान झाले होते. वाचा गमावण्याची वेळ आलेल्या महिलेवर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी आपले कौशल्य पणाला लावले. त्यांच्या यशस्वी कामगिरीचे कौतुक होत आहे.
गेल्या १७ मार्चला एका ३९ वर्षीय विवाहित महिलेला गंभीर जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रितू के. शेठ यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय चमूने अवघ्या काही क्षणांत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. देविका शेरे, निवासी वैद्यकीय अधिकारी पूर्णिमा कुमार, डॉ. सुब्रमण्यम अय्यर आणि भूलतज्ज्ञ डॉ. योगीता किंजाले, त्यांचे सहकारी डॉ. महेश डोंगरे या वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्या महिलेचे स्वरयंत्र वाचवले. त्या महिलेला आता घरी सोडले असल्याची माहिती डॉ. रितू शेठ यांनी दिली.
...
अशी झाली शस्त्रक्रिया
महिला रुग्णाच्या मानेवर खोलवर जखमा झाल्याने ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीच्या स्वरूपाची होती. कारण या महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले तेव्हा जखमेमुळे श्वसनलिका खुली झाली होती. तसेच प्रचंड रक्तस्रावदेखील झाला होता. जखम स्वरयंत्रापर्यंत खोलवर असल्याने एकाच वेळी या सर्व बाबींवर उपचार करणे आवश्यक झाले होते. अशा वेळी तातडीने श्वसननलिका दुरुस्त करत या महिलेचे प्राण वाचवले. स्वरयंत्रही वाचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com