१५ लाख ग्राहकांकडून ऑनलाईन भरणा

१५ लाख ग्राहकांकडून ऑनलाईन भरणा

कल्याण, ता. २८ (बातमीदार) ः महावितरणच्या कल्याण परिमंडळातील १५ लाख ८६ हजार लघुदाब ग्राहकांनी मार्च महिन्यात २८८ कोटींचा ऑनलाईन भरणा केला आहे. विजबिलाचे या वर्षातील १३८ कोटी रुपये वसूल होणे अजून बाकी आहे. ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सुरक्षित असे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पुढील तीन दिवसांत अधिकाधिक ग्राहकांनी या सुविधेचा वापर करून चालू वीजबिल व थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर आणि ग्राहकांसाठीच्या मोबाईल अ‍ॅपवर सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील वीजबिले पाहण्यासह ते भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट ॲपच्या माध्यमातून सुलभ व सुरक्षितपणे ऑनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा आहे. ही सुविधा नि:शुल्क असून ऑनलाईन पेमेंटवर वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते.

कल्याण मंडळ १ मध्ये (कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली) ४ लाख ३२ हजार ६७२ ग्राहकांनी ६७ कोटी ५३ लाख रुपये ऑनलाईन भरले असून १० कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. कल्याण मंडळ २ मधील (उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड) ३ लाख ९१ हजार ७५९ ग्राहकांनी ७१ कोटी ४६ लाख भरले असून ७१ कोटी ८१ लाखांची थकबाकी आहे. वसई मंडळातील (वसई, विरार, नालासोपारा, वाडा, आचोळे) ५ लाख ९२ हजार ३५५ ग्राहकांनी ११९ कोटी १७ लाख भरले असून २५ कोटी ६१ लाखांची थकबाकी आहे; तर पालघर मंडळमध्ये (पालघर, डहाणू, बोईसर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी) १ लाख ६८ हजार ९२२ ग्राहकांनी ३० कोटी ३३ लाख रुपयांच्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा केला असून ३० कोटी २३ लाखांची थकबाकी वसूल होणे अजूनही बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com