लग्नाच्या प्रलोभनाने अत्याचार

लग्नाच्या प्रलोभनाने अत्याचार

अंधेरी, ता. २८ (बातमीदार) ः लग्नाच्या भूलथापा मारून तरुणीवर अत्याचार झाल्याच्या दोन घटना अंधेरी आणि मालाड परिसरात उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी फसवणुकीसह अत्याचाराचा गुन्हा नोंद होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अमरदीप पपिंदरसिंग सिगसराईत आणि ऋषभ जालिंदर पाहवा अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही न्‍यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. अंधेरी येथे राहणारी ३० वर्षांची महिला एका डिजिटल मार्केटिंग कंपनीत मॅनेजर या पदावर काम करते. सहा वर्षांपूर्वी तिची ओळख अमरदीपशी झाली आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. या ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यावर सतत अत्याचार केल्‍याचा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अमरदीपला पोलिसांनी अटक केली. दुसऱ्‍या गुन्ह्यांत ऋषभ पाहवा याला मालाड पोलिसांनी अटक केली. २०१२ रोजी त्याची तक्रारदार तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्याने तिला लग्नाच्या भूलथापा मारल्या होत्या. त्यानंतर फेबुवारी २०२२ पर्यंत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. इतकेच नव्हे, तर तिला आर्थिक गुंतवणुकीच्या विविध योजना सांगून तिच्यासह तिच्या परिचित लोकांकडून ९२ लाख रुपये घेतले होते. मात्र ही रक्कम न देता त्याने त्यांची फसवणूक केली होती. या प्रकरणी अपहारासह फसवणूक, अत्याचाराचा गुन्हा नोंद होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com