टेंभा गावात अमृतमहोत्‍सवी रामनवमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेंभा गावात अमृतमहोत्‍सवी रामनवमी
टेंभा गावात अमृतमहोत्‍सवी रामनवमी

टेंभा गावात अमृतमहोत्‍सवी रामनवमी

sakal_logo
By

खर्डी, ता. २९ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील वैतरणा नदीच्या किनारी वसलेले टेंभा हे एक छोटेसे गाव असून, या ठिकाणी १९४८ पासून रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गावातील तत्कालीन ज्‍येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन हा उत्सव सुरू केला. १९४८ मध्‍ये मंडप टाकून सुरुवात झालेल्‍या या उत्‍सवाचे रूपांतर मंदिरात झाले.
या ठिकाणी सर्वधर्म समभाव ही परंपरा टिकवली असून, विशेष म्हणजे हिंदू-मुस्लिम एकत्र येऊन ७५ वर्षांपासून रामनवमी मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात. या वर्षी गुरुवार, ३० मार्च रोजी हा उत्सव साजरा होणार असून, १० वाजता अभिषेक, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म व महाआरती, दुपारी १ वाजता सत्यनारायणाची महापूजा, ३ वाजता पालखी सोहळा व श्रीरामाची भव्य मिरवणूक, रात्री ८ वाजता महाप्रसाद, ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत यासाठी स्थानिक युवा वर्ग मेहनत घेत आहे.
---------------------------------
यंदा आम्ही रामनवमीचा अमृतमहोत्‍सव साजरा करत असून, ७५ वर्षांपूर्वी पूर्वजांनी सुरू केलेली रामनवमी आजच्या पिढीनेही सुरू ठेवली आहे. प्रभू श्रीरामाचे हे मंदिर खर्डी विभागात एकच असूनदेखील दुर्लक्षित आहे.
- बाळू गणपत घोडविंदे, ग्रामस्थ टेंभा