ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीचा व्हिडिओ

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीचा व्हिडिओ

मुंबई, ता. २९ : वीज ग्राहकांमध्ये सायबर फसवणुकीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने #ScammersKiBattiGul हा शैक्षणिक व्हिडीओ तयार केला आहे. ग्राहकांना फसवणारे विविध प्रकारचे सायबर घोटाळे कसे होतात आणि अशा घोटाळ्यांबाबत ग्राहकांनी काय खबरदारी घ्यावी; तसेच ग्राहकांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, हे सांगण्याचा या व्हिडीओचा उद्देश आहे. सायबर फसवणुकीचा मोठा फटका ग्राहकांना बसू शकतो, म्हणून त्यांना जागरुक करण्याचा हा प्रयत्न असल्याचे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या @Adani_Elec_Mum या हँडलवर हा शैक्षणिक व्हिडीओ पाहता येईल. संशयित बनावट संदेश किंवा सायबर फसवणूक संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी १९१२२ या सतत सुरू असलेल्या टोल फ्री हेल्पलाईनवरही ग्राहक संपर्क साधू शकतात किंवा helpdesk.mumbaielectricity@adani.com येथे ईमेल करू शकतात, असे कंपनीने कळविले आहे.
बिल भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे -
१. ग्राहकांचा पासवर्ड, पेमेंट ओटीपी किंवा बँक तपशील कधीही विचारत नाही.
२. वीज देयकासाठी ग्राहकांच्या मोबाईल/लॅपटॉपची स्क्रीन शेअर करण्यास कधीही सांगत नाही.
३. खाजगी अनोंदणीकृत क्रमांकाद्वारे कोणतेही संदेश कधीही पाठवीत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com