Sat, June 10, 2023

सारंग चषकाचा ‘साई आटो’ मानकरी
सारंग चषकाचा ‘साई आटो’ मानकरी
Published on : 29 March 2023, 10:49 am
विरार, ता. २९ (बातमीदार) : बहुजन विकास आघाडी व सारंग मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल घरत यांनी आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत विरारचा साई आटो संघ सारंग चषकाचा मानकरी ठरला; तर नालासोपाऱ्याचा वीर मराठा संघ उपविजेता ठरला. तृतीय पारितोषिक ठाण्याच्या विशाल स्पोर्टने पटकावले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्वप्नील भिलारे, राहुल गुजर यांना गौरविण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कबड्डी स्पर्धेत पालघर, मुंबई, ठाणे, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते. यात एकूण ४२ संघांनी यात भाग घेतला.