गांजा विक्री करणारा अटकेत

गांजा विक्री करणारा अटकेत

नवी मुंबई (वार्ताहर) : सीबीडीतील टाटानगर झोपडपट्टीत गांजाविक्री करणाऱ्याला अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा लावून अटक केली आहे. विशाल घोडे (वय- ३२) असे या यक्तीचे नाव असून त्याच्याजवळ ३ किलो २०० ग्रॅम वजनाचा सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा गांजा सापडला आहे.
सीबीडीतील टाटानगर झोपडपट्टीत राहणारा विशाल घोडे अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. सय्यद यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी सीबीडीतील टाटा नगर झोपडपट्टीत छापा मारला होता. यावेळी पथकाने घेतलेल्या झडतीत पिशवीमध्ये ३ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com