सावरकरांच्या जीवनावरील पैलूंचे दर्शन

सावरकरांच्या जीवनावरील पैलूंचे दर्शन

जुईनगर, ता. २९ (बातमीदार)ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी आजच्या पिढीला माहिती होण्यासाठी बेलापूर पामबीच मार्ग ते वाशी शिवाजी चौकापर्यंत वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नवी मुंबई भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या माध्यमातून सावरकरांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच त्यांची खासदारकी रद्द केली गेली. नंतर त्यांनी ‘मी माफी मागणार नाही, मी गांधी आहे, सावरकर नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात ‘स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर गौरव यात्रे’ची घोषणा केली होती. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईत ही गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख किशोर पाटकर, भाजप युवा उपाध्यक्ष पांडुरंग आमले आदी उपस्थित होते.
---------------------------------------------
असा असेल यात्रेचा मार्ग
या गौरव यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील विविध पैलूंसह माहिती प्रदर्शनी दाखवली जाणार आहे. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे अभूतपूर्व योगदान समाजातील सर्व घटकांतील वर्गापर्यंत पोहोचवण्याचे कार्य यानिमित्ताने होणार आहे. ही गौरव यात्रा महापालिकेसमोरील गोवर्धनी माता मंदिराच्या प्रवेशद्वारापासून निघणार असून ती पामबीच मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत येणार आहे.
---------------------------------------------
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे पोरकटपणाचे आहे. त्यांच्या घटक पक्षांतही एकमत नाही. स्वतः शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागत आहे. सावरकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दूषित असून, तसेच आजच्या पिढीला सत्य परिस्थिती सांगण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे.
- मंदा म्हात्रे, आमदार, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com