Fri, June 2, 2023

आजाराला कंटाळून आत्महत्या
आजाराला कंटाळून आत्महत्या
Published on : 29 March 2023, 12:31 pm
विक्रमगड, ता. २९ (बातमीदार) ः ज्येष्ठ नागरिकाने आजाराला कंटाळून गळफास घेतल्याची घटना गडदे (उंबरपाडा) येथे घडली आहे. भिवा देवजी खरपडे (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
भिवा देवजी खरपडे यांची तीन वर्षांपूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. अधूनमधून त्यांच्या पोटात दुखत असे. या त्रासाला कंटाळून त्यांनी २७ मार्च रोजी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूबाबत कोणावरही संशय नसून कोणाविरोधात तक्रार नाही, असे त्यांचा मुलगा नकुल खरपुडे याने सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत अधिक तपास विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते करत आहेत.