हिमालय पूल आजपासून सुरू

हिमालय पूल आजपासून सुरू

मुंबई, ता. २९ ः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाजवळील हिमालय पूल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवार (ता. ३०) पासून सुरू होणार आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकाजवळील भुयारी मार्गात होणारी गर्दी कमी होईल आणि रस्ता ओलांडण्याचा त्रासही दूर होणार आहे.

हिमालय पूल १४ मार्च २०१९ मध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला होता. दुर्घटनेनंतर पूल पाडून नवीन बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला. तीन वर्षांपासून पुलाचे काम सुरू होते. नवीन आराखड्यानुसार हिमालय पूल टिकाऊ अशा स्टेनलेस स्टीलचा बांधण्यात आला असून उद्यापासून तो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती पालिकेच्या रस्ते व पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हिमालय पुलाचा सरकता जिना बसवण्याच्या कामाला चार ते पाच महिन्यांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे ३० मार्चपासून पूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. मजबूत व टिकाऊ पुलासाठी ओडिशाहून मागवण्यात आलेले स्टेनलेस स्टीलचे १२० टनचे पाच गर्डर वापरण्यात आले असून किमान ५० वर्षे ते टिकून राहतील, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com