लाचखोर हवालदाराला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाचखोर हवालदाराला अटक
लाचखोर हवालदाराला अटक

लाचखोर हवालदाराला अटक

sakal_logo
By

भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : गुटखा व तंबाखुची विक्री करू देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या अमितकुमार पाटील या पोलिस हवालदारासह दोघांना अटक केली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तक्रारदार दुकानदार यापूर्वी गुटखा आणि तंबाखूची विक्री करत असे. मात्र सध्या त्याने विक्री बंद केली आहे. असे असताना अमितकुमार पाटील याने त्याच्याकडे गुटखा व तंबाखू विक्री करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये याप्रमाणे दोन महिन्यांचे १६ हजार रुपये मागितले. त्यामुळे दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून पाटील याला दहा हजारांची रक्कम स्वीकारताना अटक केली.