भिसेगाव-चारफाटा रस्ता प्रतीक्षेत

भिसेगाव-चारफाटा रस्ता प्रतीक्षेत

कर्जत, ता. ३० (बातमीदार) : कर्जत नगरपालिका हद्दीतील भिसेगाव ते चारफाटा या रस्त्याचे काम सुमारे दोन वर्षापासून सुरू आहे. मात्र ठेकेदाराने अद्यापी रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने नागरिकांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करून लांबून वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
अनेक वर्षांपासून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका यांच्या वादामुळे रखडलेला होता. स्थानिक नगरसेवकांनी उपोषण केल्याने अखेर दोन वर्षांपूर्वी नगरपालिकेने चारफाटा ते भिसेगाव या रस्त्याचे कार्यादेश काढले. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर कामाला सुरुवात तर झाली; मात्र ती धीम्या गतीने सुरू आहे. दोन वर्षे झाले, तरी आजतागायत या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. अखेर स्थानिकांनी या विरोधात नगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढला. त्या वेळेस रस्त्याचे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, मार्च उलटूनही या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे काम धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करून वळसा घालावा लागत आहे.

भिसेगाव ते चारफाटा रस्त्याचे काम अपूर्ण आहे. रस्ता अरुंद असून साईटपट्ट्या न भरल्यामुळे बस सेवा सुरू करू शकत नाही. त्यासाठी रस्त्याचे काम परिपूर्ण होणे गरजेचे आहे.
- देवानंद मोरे, आगार व्यवस्थापक, कर्जत

दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले नाही, तर ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येईल. तसेच लवकरात लवकर काम पूर्ण करून नागरिक, प्रवाशांसाठी रस्ता खुला करण्याचा प्रयत्न राहील.
- वैभव गारवे, मुख्याधिकारी, कर्जत नगरपालिका

नगरपालिकेमध्ये याप्रकरणी सतत पाठपुरावा करत आहे. नगरपालिकेने ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे सांगूनही ते धीम्या गतीने करत आहेत. अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात नगरपालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.
- सोमनाथ ठोंबरे, नगरसेवक, कर्जत नगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com