नेरळमध्ये रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरळमध्ये रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
नेरळमध्ये रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

नेरळमध्ये रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

sakal_logo
By

नेरळ, ता. ३० (बातमीदार) : नेरळ रेल्वे स्थानकात बुधवारी (ता. २९) सायंकाळी एका प्रवाशाला रेल्वेची धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. रेल्वे रूळ ओलांडताना ही धडक बसली होती. रेल्वे लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बल यांनी कार्यतत्परता दाखवत प्रवाशाला तत्काळ उपचारासाठी नेले; मात्र गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
वडवली येथील एकनाथ लदगे हे प्रवासी बुधवारी सायंकाळ सातच्या सुमारास नेरळ रेल्वे स्थानकातून कर्जत दिशेने जाणारी ट्रेन पकडण्याच्या गडबडीत होते. यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून १ वर जाताना त्यांनी पादचारी पुलाचा वापर न करता थेट रूळ ओलांडले. त्याच वेळी त्यांना मुंबईकडे जाणाऱ्या लोकलची धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले होते. हा प्रकार रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बल यांच्या लक्षात आल्यावर त्‍यांनी तत्काळ कार्यतत्परता दाखवत त्यांना नेरळ प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना लदगे यांचा गुरुवारी मृत्यू झाला. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी नेरळ स्थानकात अधिकच्या पादचारी पुलांचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, रूळ ओलांडणे धोक्याचे आहे, हे माहीत असतानाही प्रवासी हा धोका पत्करतात, हा चिंतेचा विषय ठरत आहे.