कर थकवल्यास कारवाईचा इशारा

कर थकवल्यास कारवाईचा इशारा

विक्रमगड, ता. ३० (बातमीदार) : नगरपंचायत क्षेत्रात मोठ्याप्रमाणात मालमत्ता कर आणि पाणीपटी भरण्यास नागरिक उदासिन आहेत. यामुळे या कराची थकबाकीची रक्कम वाढली आहे. या थकीत रक्कम वसुलीसाठी सध्या विक्रमगड नगरपंचायतीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून थकबाकीदारांना कर न भरल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. विक्रमगड नगरपंचायत मालमत्ता कराची थकीबाकी ७० लाखांवर गेली आहे. तर चालु वर्षीची थकबाकी ३१ लाख आहे. तसेच पाणीपट्टीची थकबाकी ४० लाखांवर तर चालु वर्षाची थकबाकी रक्कम १० लाखा इतकी आहे. नगरपंचायतीने घंटागाडी गावात फिरवून नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचर थकीत रक्कम भरावी अन्यता कारवाई करण्यात येईल, अशा सूचना दिल्या जात आहे. विक्रमगड नगरपंचायत क्षेत्राची लोकसंख्या जवळपास १० हजारांच्या आसपास आहे. यामध्ये विक्रमगड शहरासह, टोपलेपाडा, वाकडुचापाडा, यशवंतनगर या गावांचा समोवश आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com