कळवा परिसरात आगीच्या दुर्घटना

कळवा परिसरात आगीच्या दुर्घटना

कळवा, ता. ३० (बातमीदार) : कळवा परिसरात बुधवारी रात्री (ता.३०) दोन ठिकाणी अचानक लागलेल्या आगीच्या घटनेत एक झाड व एका चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास खारेगाव येथील राज पार्क सोसायटी समोर अचानक एका झाडाला आग लागल्याची घटना घडली. तर कळवा नाका येथील विक्रम एंटरप्रायजेस कंपाऊंडमध्ये इम्तियाज शरीफ यांच्या गॅरेजमध्ये कचऱ्याच्या ढीगाजवळ रात्री पावणे दोनच्या सुमारास अचानक आग लागून तेथे पार्क केलेल्या चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे ही आग परिसरात पोहचल्याने घटनास्थळी टोरंट पॉवरचे कर्मचारी, कळवा पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत गाडी जळून भस्मसात झाली आहे.

आजपासून खाद्योत्सव, ठाणे चैत्रोत्सव
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : विश्वास सामाजिक संस्थेतर्फे शुक्रवारपासून ठाणे चैत्रोत्सव आणि खाद्योत्सव असे भव्य प्रदर्शनाचे आयोजन ठाण्यातील ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले यांच्या संस्थेकडून करण्यात आलेले आहे. गडकरी रंगायतनसमोरील हनुमान व्यायाम शाळेच्या मैदानावर उद्यापासून दहा दिवस म्हणजे ९ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ११ ते ९ पर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. भाजपचे आमदार संजय केळकर व अॕड. निरंजन डावखरे यांच्या हस्ते ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पितांबरीचे संचालक रवींद्र प्रभूदेसाई, ‘टीजेएसबी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनिल साठे, नॕशनल थर्मल पॉवरचे संचालक विद्याधर वैशंपायन, विशेष उपस्थिती म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री कांचन गुप्ते व अभिनेत्री पूर्वा गोखले उपस्थित असणार आहेत. स्थानिक व राज्यातील उद्योजक, व्यापाऱ्यांना विक्रीचे सक्षम व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा ठाणे चैत्रोत्सव भरविण्याचा संस्थेचा उद्देश आहे. या प्रदर्शनाद्वारे माफक दरात विक्री ते थेट ग्राहक ही मेक ईन इंडिया, स्टार्टअपची संकल्पना राबविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com