पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा दोन एप्रिलला

पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा दोन एप्रिलला

भाईंदर, ता.३० (बातमीदार) : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयासाठी सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा येत्या दोन एप्रिलला घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी एकूण १२१२७ पात्र उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यात ३२६९ महिला व ८८५८ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. महिला उमेदवारांची लेखी परीक्षा मिरा रोड येथील स्वर्गीय बाळा साहेब ठाकरे मैदान व पुरुष उमेदवारांची परीक्षा भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान येथे घेण्यात येणार आहे.
आयुक्तालयात पोलिस शिपाई व चालक अशा ९९६ पदांच्या जागासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. भरतीसाठी शारिरिक व मैदानी चाचणी २ जानेवारीला सुरू झाली होती. या पदांसाठी सुमारे ७१ हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यात ५९ हजार ८४७ पुरुष व १२ हजार १०४ महिला उमेदवारांचा समावेश होता. त्यापैकी ४९४७९ उमेदवारच प्रत्यक्ष चाचणी प्रक्रियेत सहभागी झाले होते. दोन एप्रिलच्या लेखी परीक्षेसाठी सकाळी सहा वाजता हजर राहण्याच्या सूचना उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेवर कॅमेऱ्‍यांची नजर रहाणार असून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यालय उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.
.....
चालक पदाची परीक्षा सुरळीत
पोलिस चालक पदासाठी पात्र उमेदवारांची २६ मार्चला लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या १०४ उमेदवारांपैकी प्रत्यक्ष परीक्षेसाठी ९९ उमेदवार हजर होते. ही लेखी परीक्षा पडताळणी, बायोमेट्रिक, फ्रीस्किंग, सीसीटीव्ही, चित्रीकरण आदी पारदर्शक व्यवस्थेसह कडक बंदोबस्तात पार पडली.
....
महिला उमेदवारांसाठी राहण्याची सोय
लेखी परीक्षेसाठी येणाऱ्‍या महिला उमेदवारांची रहाण्याची सोय मिरा भाईंदर महानगरपालिकेने केली आहे. महिला उमेदवारांसाठी मिरा रोड येथील महापालिकेच्या प्रमोद महाजन सभागृह, मिनाताई ठाकरे सभागृह तसेच अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह येथे विनामुल्य राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com