पनवेलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर

पनवेलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर

पनवेल : पनवेल येथे ‘मिशन रोशनी’अंतर्गत नेत्रतपासणी आणि चिकित्सा शिबिरात तालुक्यातील ८० शाळांमधील ३५,५६० विद्यार्थी सहभागी झाले होते. यात १,१२३ (३.५ टक्के) मुलांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यानुसार सुमारे ९६९ मुलांना मोफत चष्मेदेखील देण्यात आले. पाच मुलांना मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) आणि स्ट्रॅबिस्मस असल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यावर तात्काळ मोफत उपचार सुरू करण्यात आले. यासह नऊ मुलांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पनवेल येथील आर. जे. संकरा आय हॉस्पिटलतर्फे कॉग्निझन्ट फाऊंशेन आणि मिशन फॉर व्हीजनसह एकत्र येऊन हा उपक्रम राबवला. या वेळी डॉ. अंकिता पाटिल, सुनील चव्हाण उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com