कुत्र्यांवर दगडफेक केल्याच्या वादात मारहाण

कुत्र्यांवर दगडफेक केल्याच्या वादात मारहाण

उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) : भटक्या कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तरुणाने त्यांच्या दिशेने दगड भिरकावला होता. कुत्र्यांवर दगड का मारला, अशी काही जणांनी विचारणा केल्यावर तरुणाला मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात तरुण जखमी झाल्याने उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बुधवारी (ता. २९) रात्री नऊच्या सुमारास गौरव दिलीप जाधव (वय १९) हा त्याच्या घराकडे जात असताना भटकी कुत्री त्याच्या मागे धावली. त्यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने दगड कुत्र्यांच्या दिशेने मारला. त्यावर दुकानात उभ्या असलेल्या चार तरुणांनी कुत्र्यांना दगड का मारला, असा जाब विचारून त्याला शिवीगाळ केली. गौरवने शिवीगाळ करू नका, असे म्हटल्याने संतप्त झालेल्या चौघांनी त्याला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील एकाने गौरवच्या तोंडावर लोखंडी वस्तू मारल्याने त्याचे तीन दात पडले आहेत. या प्रकरणी गौरवने दिलेल्या तक्रारीवरून चार अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे रमणिक या दुकानदाराने गौरवने त्याला मारहाण करून डोक्यावर दगड मारल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली आहे. त्यामुळे मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गौरव आणि रमणिक यांच्याविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com