दोन वाहनांच्या अपघातात दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वाहनांच्या अपघातात दोघांचा मृत्यू
दोन वाहनांच्या अपघातात दोघांचा मृत्यू

दोन वाहनांच्या अपघातात दोघांचा मृत्यू

sakal_logo
By

भिवंडी, ता. ३० (बातमीदार) : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या वाहनांच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना बुधवारी (ता. २९) घडल्या. या अपघातप्रकरणी दोन पोलिस ठाण्यांत ट्रकचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यात काल्हेर येथील शिल्पा चौकात एका वाहनचालकाने टेम्पो भरधाव वेगात चालवून सुरभी संजय वाघमारे (वय १७) या मुलीला जोरात धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद नारपोली पोलिस ठाण्यात करण्यात आली असून टेम्पोचालक निवृत्ती गंगाराम शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे; तर दुसऱ्या घटनेत भाऊसाहेब ऊर्फ विशाल मारुती कुंभारकर (वय ३३, रा. भादवड) हा दुचाकीने मित्रासोबत भिवंडी-कल्याण रोडने साईबाबा मंदिराकडे जात असताना ट्रकने दुचाकीला जोराने ठोकर मारली. या अपघातात विशालचा उपचारादरम्यान मृत्यू; तर त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. मृताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या अपघातप्रकरणी विशालचा भाऊ नितीन कुंभारकर याच्या फिर्यादीवरून शांतिनगर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल असून ट्रकचालक फरारी आहे.