ऐरोली-काटई नाका प्रकल्पाला वेग

ऐरोली-काटई नाका प्रकल्पाला वेग

मुंबई, ता. ३१ : एमएमआरडीएच्या पथकाने गुरुवारी ऐरोली-काटई नाका प्रकल्पाच्या पहिल्या भागातील शेवटच्या पीएससी आय गर्डरच्या उभारणीसह या भागातील सर्व गर्डरचे काम पूर्ण केले आहे.
ठाणे बेलापूर रोडवर भारत बिजली जंक्शन ऐरोली येथील एकूण १६ पीएससी आय गर्डर बसवण्यात आले. हे गर्डर २३ ते २८ मीटर लांबीचे असून प्रत्येक गर्डरचे वजन जवळपास ४८ मेट्रिक टन इतके आहे. सुमारे २५० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेनच्या साह्याने हे गर्डर बसवण्यात आले. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आले. पहिला ब्लॉक २५ आणि २६ मार्च आणि दुसरा ब्लॉक २९ आणि ३० मार्चदरम्यान रात्री १०:३० ते सकाळी ६:०० या कालावधीत घेण्यात आला.
एमएमआरडीए कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई दरम्यान अखंड तसेच वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने १२.३ किलोमीटरचा ऐरोली-काटई नाका रस्ता बांधत आहे. ऐरोली-काटई नाका प्रकल्प मुलुंड-ऐरोली पुलापासून सुरू होऊन ठाणे-बेलापूर मार्गे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरून कल्याण-शीळ रस्त्यावरील काटई नाक्यापर्यंत विस्तारला आहे. या प्रकल्पामुळे वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल आणि सुलभता मिळेल; तसेच कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या दोन्ही भागांत वाहतूक कोंडी कमी होईल.
..
महत्त्वपूर्ण टप्पा गाठला!
‘एमएमआरडीएच्या टीमने ऐरोली-काटई नाका प्रकल्पात पहिल्या भागातील ऐरोली बाजूचा शेवटचा पीएससी आय गर्डर बसवण्याचे काम करून महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. त्यामुळे आता प्रकल्पातील पहिला भाग हा दुसऱ्या भागासोबत जोडला जाईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सांगितले.
...
असा असेल मार्ग
- १२.३ किमी लांबीचा हा प्रकल्प तीन भागांत विभागलेला आहे. पहिल्या भागात ठाणे-बेलापूर रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (जुना मुंबई पुणे महामार्ग) दरम्यान ३.४३ किमी लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाचा समावेश आहे. पहिल्या भागात ३+३ मार्गिकांसह १+१ रेफ्युज मर्गिकेचा १.६९ किमी लांबीचा दुहेरी बोगदा असून उर्वरित रस्ता उन्नत आणि सामान्य रस्ता असेल. या भागातीलतील उन्नत मार्गिकेचे काम ९२ टक्के पूर्ण झाले आहे; तसेच बोगद्याचे ६६ टक्के काम पूर्ण झाले आहे.
- दुसऱ्या भागात २.५७ किमीचा संपूर्ण उन्नत रस्ता असेल जो मुलुंड-ऐरोली पुलाला ठाणे-बेलापूर रोडला जोडेल. या भागातील सुमारे ६७.५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
- प्रकल्पाच्या तिसऱ्‍या भागात कल्याण-शीळ रोड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई नाका यांना जोडणारा ६.३० किमीचा पूर्ण उन्नत मार्ग असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com