Tue, June 6, 2023

डोंबिवलीत आज लक्ष्मीपल्लीनाथ उत्सव
डोंबिवलीत आज लक्ष्मीपल्लीनाथ उत्सव
Published on : 1 April 2023, 10:21 am
डोंबिवली, ता. १ (बातमीदार) : डोंबिवलीत रविवारी (ता. २) श्री लक्ष्मीपल्लीनाथ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव डोंबिवली पूर्व टिळक नगर येथील समाज मंदिर हॉलमध्ये सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे. या उत्सवात लघु रुद्र पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, आरती आदा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मोहन आठल्ये यांनी दिली.