ठाण्यात आरटीईचे ३० हजार अर्ज

ठाण्यात आरटीईचे ३० हजार अर्ज

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १ : दुर्बल घटकांतील बालकांना मोफत व उच्च प्रतीचे, दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळांकडून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते. ठाणे जिल्ह्यातील सरकारी व खासगी अनुदानित शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. त्यानुसार मागील महिनाभरापासून सुरू असलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया अखेर २५ मार्च रोजी संपुष्टात आली. यासाठी ठाणे जिल्ह्यातून सुमारे ३० हजार ५५७ अर्ज दाखल झाले आहेत. गत वर्षापेक्षा यंदा ५ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी १ मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. यंदा नव्या शैक्षणिक वर्षासाठी ३० हजार ५५७ अर्ज आले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक अर्ज आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या वर्षी २५ हजार ७०२ अर्ज दाखल झाले होते, तर यंदा ५ हजार अर्जांची भर पडली आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता १२ हजार २६७ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी पंचायत समिती आणि महापालिका परिसरातील ६२९ शाळा पात्र आहेत.
.......................
यंदा नव्या शैक्षणिक वर्षासाठी ३० हजार ५५७ अर्ज आले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक अर्ज आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. यामध्ये ठाण्यातून सर्वाधिक ७१९५, त्या खालोखाल कल्याण - डोंबिवली ६५३८, नवी मुंबईतून ६४६७ अर्ज आले आहेत.
...............
आरटीई अंतर्गत सन २०२३- २४ प्रवेश प्रक्रियेसाठी प्राप्त झालेले अर्ज
शहर प्राप्त अर्ज
अंबरनाथ ३३९३
भिवंडी ४१३७
कल्याण-डोंबिवली ६५३८
मिरा-भाईंदर ५२०
मुरबाड १९४
नवी मुंबई ६४६७
शहापूर १११६
ठाणे ७१९५
उल्हासनगर ९९७
...........
एकूण ३०५५७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com