भाजप विरोधात काँग्रेसचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप विरोधात काँग्रेसचे आंदोलन
भाजप विरोधात काँग्रेसचे आंदोलन

भाजप विरोधात काँग्रेसचे आंदोलन

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात सध्या भाजप विविध प्रकारे कारवाया करत असल्याच्या आरोपावरून आज घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती-जमाती विभागाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यात काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ‘तब लडे थे गोरो से, अब लढेंगे चोरों से’ अशा घोषणा देण्यात आल्या. लोकतंत्र बचाव अभियान अंतर्गत काँग्रेसच्या वतीने रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज सकाळी ११ वाजता हे आंदोलन केले. या वेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संविधानविरोधी केंद्र सरकारच्या विरोधात हे शांततापूर्ण धरणे आंदोलन केल्याचे काँग्रेस अनुसूचित विभागाचे मुंबई अध्यक्ष रमेश कांबळे यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ नेते भाई जगताप, चरसिंग सप्रा आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.