बनावट जॉब लेटर देऊन अनेकांची फसवणूक

बनावट जॉब लेटर देऊन अनेकांची फसवणूक

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : आखाती देशांत नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून बनावट जॉब लेटर देऊन अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी युनिकॉर्न टुरिझम ॲण्ड हॉलिडेजचा मालक आलमदार हुसैन (वय ५५) याच्याविरोधात नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या कार्यालयातून कुवेत प्रोजेक्ट्स होल्डिंग कंपनीचे २२ जॉब ऑफर लेटर देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले.

आलमदार हुसैन (रा. लोखंडवाला वसाहत, मुंबई) याने मार्च २०२२ मध्ये घणसोलीतील सेक्टर-६ मधील महावीर वर्षा इमारतीत युनिकॉर्न टुरिझम ॲन्ड हॉलिडेज या नावाने कार्यालय थाटले होते. त्यामुळे परदेशातील नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक व्यक्तींनी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. बेरोजगारांची कागदपत्रे व्हॉट्सॲपवर मागवून घेऊन परदेशातील नोकरीसाठी असलेल्या नोकरीनुसार त्यांना जॉब लेटर व व्हिसाचे काम करत असल्याचे त्यांना सांगत होता. त्यामुळे अनेक गरजवंतांनी त्याच्याकडे कागदपत्रे दिली होती. हुसैन याने कुवेत येथील अल रशीद इंटरनॅशनल शिपिंग कंपनीचे बनावट जॉब लेटर देऊन त्यांना नोकरी देण्याचा बहाणा करत असे; मात्र काही व्यक्तींनी या शिपिंग कंपनीकडे संपर्क साधल्यानंतर त्यांना बनावट जॉब लेटर देऊन फसवणूक करण्यात आल्याचे कंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे या कंपनीने कुवेतमधील भारतीय दूतावासाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती.

कार्यालय बंद करत पलायन
दूतावासाने मुंबईतील पारपत्र कार्यालयाकडे कारवाईच्या सूचना केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांना सूचित केले होते. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने घणसोलीतील कार्यालयाची झाडाझडती घेतली; मात्र त्यापूर्वीच हुसैन याने कार्यालय बंद करून पलायन केले. त्याच्याविरोधात रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com