स्विडीश नागरिकाकडून क्रू मेंबरचा विनयभंग

स्विडीश नागरिकाकडून क्रू मेंबरचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : इंडिगो कंपनीच्या फ्लाईटमध्ये क्रू मेंबरचा विनयभंग केल्याप्रकरणी एका स्वीडिश नागरिकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. क्लास एरिक वेस्टबर्ग (वय ६३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो स्वीडन देशाचा नागरिक आहे. वेस्टबर्ग हा गेल्या तीन महिन्यांत कथित बेशिस्त वर्तनासाठी अटक करण्यात आलेला आठवा प्रवासी आहे.

इंडिगो कंपनीच्या बँकॉक-मुंबई फ्लाईटमध्ये गुरुवारी (ता. ३०) ही विनयभंगाची घटना घडली. या घटनेदरम्यान आरोपी क्लास एरिक वेस्टबर्ग हा कथितरीत्या मद्यधुंद अवस्थेत होता. विमानातील खाद्यपदार्थ खरेदी करताना क्रू मेंबरला अयोग्यरीत्या स्पर्श केल्याचा आणि हस्तक्षेप करणाऱ्या सहप्रवाशाला मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. विमान मुंबई विमानतळावर उतरल्यावर वेस्टबर्गला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीवर विनयभंग आणि विमान कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com