एप्रिलअखेर एसटीच्या ताफ्यात १५० ई-बस

एप्रिलअखेर एसटीच्या ताफ्यात १५० ई-बस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः इलेक्ट्रिक बस, बाईकला गेल्या काही दिवसांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बॅटरी सर्टिफिकेशन केले जाणार आहे. बॅटरी सर्टिफिकेशन करण्याचे नियम बदलण्यात आले असून, एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसच्या बॅटरीला ‘आयकॅट’ या नोंदणी संस्थेकडून नवीन कोड देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा असणाऱ्या ७५ इलेक्ट्रिक बस एप्रिलअखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

केंद्राच्या इलेक्ट्रिक बस धोरणांतर्गत एसटी महामंडळातसुद्धा इलेक्ट्रिक बसची खरेदी केली जात आहे. पहिल्या टप्प्यात १५० इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार असून, मार्चअखेर या बस दाखल होतील अशी अपेक्षा होती; मात्र आणखी एक महिना या बसेसची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नॉर्थ इंडियन आयकॅट कंपनीमध्ये सध्या या इलेक्ट्रिक बसेसच्या कोड सर्टिफिकेशनचे काम सुरू आहे. त्यामुळे या बस एप्रिलमध्ये दाखल होणार आहेत.

या बस प्रामुख्याने पुणे-मुंबई, पुणे-छत्रपती संभाजीनगर, पुणे-ठाणे, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-बोरिवली या मार्गांवर धावणार आहेत. सध्या एकमेव कार्यरत असणाऱ्या शिवाई एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १ जूनला ताफ्यात पहिली ई-बस शिवाई दाखल झाली. त्यानंतर नऊ महिने झाले तरी दुसरी ई-बस दाखल झालेली नाही. एसटी महामंळाने सुमारे ५ हजार इलेक्ट्रिक बसेस घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
-----
इलेक्ट्रिक गाड्यांच्या आगीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे बॅटरीचे सर्टिफिकेशन करणे आवश्यक आहे. नवीन नियमानुसार सध्या इलेक्ट्रिक बसेसच्या बॅटऱ्यांची नोंदणी सुरू आहे. नोंदणी पूर्ण होताच बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com