नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात
नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात

नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात

sakal_logo
By

वाडा, ता. २ (बातमीदार) : तालुक्यातील भन्साळ पाडा येथील रवींद्र रसाळकर या शेतकऱ्याचे शुक्रवारी (ता. ३१) लागलेल्या वणव्याच्या आगीत घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटना व चर्मउद्योग कामगार सेनेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. या कुटुंबातील सदस्यांना अन्नधान्याचे किट व उपशहरप्रमुख प्रकाश जाधव यांनी काही आर्थिक मदत देऊ केली आहे. जिजाऊ संघटनेच्या वतीने महिला सक्षमीकरणप्रमुख हेमांगी पाटील यांच्या वतीने ही मदत या शेतकरी कुटुंब यांना पोहोचविण्यात आली; तर शिवसेनेच्या वतीने चर्मोद्योग कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष व शहर समन्वयक भरत गायकवाड यांनी ही मदत देऊ केल्याने या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.