वाड्यात सावरकर गौरव यात्रेचे स्वागत

वाड्यात सावरकर गौरव यात्रेचे स्वागत

वाडा, ता. २ (बातमीदार) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गौरव रथयात्रेचे शनिवारी (ता. १) वाडा तालुक्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. सावरकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार व्हावा, या हेतूने ही गौरवयात्रा काढण्यात आली असल्याचे जिल्हा भाजपच्या वतीने सांगण्यात आले. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मनोर येथे जनकल्याण सभागृहात या गौरव रथयात्रेचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून शुभारंभ करण्यात आला.
वाडा तालुक्यातील कंचाड, खानिवली, वाडा व परळी अशी विभागवार ही सावरकर गौरव रथयात्रा काढण्यात आली. या यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या गौरव रथयात्रेत ठाणे ग्रामीण भाजपचे प्रभारी व ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे,डॉ. हेमंत सवरा, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, कृष्णा भोईर, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, ज्येष्ठ नेत्या शुभांगी उत्तेकर, मनीष देहरकर, मेघना पाटील, धनश्री चौधरी, अर्चना भोईर, अश्विनी शेळके, अंकिता दुबेले, रिमा गंधे, अंजनी पाटील, नयना इंगळे, कुणाल साळवी, रोहन पाटील, राजेश रिकामे, मोनिष पाटील, हर्षल खांबेकर आदी पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com