Tehsildar of state is on strike from today mumbai
Tehsildar of state is on strike from today mumbaiesakal

Tehsildar Strike : राज्यातील नायब तहसीलदार आजपासून संपावर

राज्यभरातील ३५८ तालुक्यांमधील तहसील कार्यालयात आज शुकशुकाट

नवीन पनवेल : विविध मागण्यांसाठी राज्यातील नायब तहसीलदार उद्यापासून (ता. ३) संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील ३५८ तालुक्यांमधील तहसील कार्यालयात आज शुकशुकाट असण्याची शक्यता आहे.

नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते, हा ग्रेड पे मुद्दा घेऊन नायब तहसीलदारांनी आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने १३ ऑक्टोबर १९९८ रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरून वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती.

त्यामुळे गेली २५ वर्षे राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात, मात्र वर्ग तीनचे वेतन घेत आहेत. वाढीव ग्रेड पे मागणी मान्य झाल्यास, राज्यातील २२०० पेक्षा जास्त नायब तहसीलदारांना लाभ होईल आणि सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्ष २.६४ कोटी रुपयांचा बोजा वाढेल. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com