घरफोडीच्या उद्देशाने आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक

घरफोडीच्या उद्देशाने आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक

घरफोडीसाठी आलेल्या
सराईत गुन्हेगाराला अटक
अंधेरी, ता. २ (बातमीदार) ः घरफोडीच्या उद्देशाने आलेला सराईत गुन्हेगार लक्ष्मण निर्मल याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर चोरी, घरफोडी आणि ड्रग्जसंबंधित सुमारे चौदाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. लक्ष्मणची एक टोळी असून ते नशा करण्यासाठी चोरीसह घरफोडी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शुक्रवारी मध्यरात्री ओशिवरा पोलिसांचे एक विशेष पथक जोगेश्‍वरीतील बेहरामबाग आणि विकासनगर परिसरात गस्त घालत असताना एक संशयित तरुण त्यांच्या नजरेस पडला. पोलिस चौकशीत घरफोडीच्या उद्देशाने आल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडे घरफोडीचे काही साहित्य सापडले. तपासात तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चौदाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचेही आढळले. त्याने मंगेश खिलारे आणि अक्षय डुगलज यांच्या मदतीने चोरीसह घरफोडीसाठी स्वतःची एक टोळी बनवली होती. जानेवारीमध्ये त्याला वर्षभरासाठी तडीपारही करण्यात आले होते. तडीपारीच्या कारवाईचे उल्लंघन करून घरफोडीच्या उद्देशाने तो जोगेश्‍वरी परिसरात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com