Fri, Sept 29, 2023

पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर
रेस्टॉरंट-ऑन-व्हील सुविधा
पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर रेस्टॉरंट-ऑन-व्हील सुविधा
Published on : 3 April 2023, 4:34 am
मुंबई, ता. ३ : पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांवर लवकरच रेस्टॉरंट-ऑन-व्हील आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे प्रवाशांना रेस्टॉरंट-ऑन-व्हील हॉटेलमध्ये बसून खाद्यपदार्थाची चव चाखता येणार आहे, तसेच इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंगही स्थानकांवर करता येणार आहे. त्यातून पश्चिम रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे महसूल मिळणार आहेत.
पश्चिम रेल्वेने अंधेरी, बोरिवली स्थानकात रेस्टॉरंट-ऑन-व्हील उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रशासनाने निविदा मागवल्या असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील हे पहिले रेस्टॉरंट-ऑन-व्हील असणार आहे. अंधेरी स्थानकात पूर्वेला १४३ चौरस मीटर जागेत, तर बोरिवली स्थानकात विरारच्या दिशेने रेस्टॉरंट उभारण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.