ग्रामीण भागात चुली पेटल्या!

ग्रामीण भागात चुली पेटल्या!

पेण, ता. ५ (वार्ताहर) : केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्‍ज्वल गॅस योजना चार वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये सुरुवातीला महिला लाभार्थींना मोफत गॅसजोडणी देण्यात आली. या योजनेत लाभार्थींचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आला; परंतु आता गॅस सिलेंडरचे दरच गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा चुलीकडे मोर्चा वळवला आहे. सध्या गॅस सिलेंडर केवळ शोभेला उरला असून केवळ ४० टक्केच महिला त्याचा वापर करत आहेत. पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा एकदा चुलीचा वापर सुरू केला आहे.
केंद्र सरकारने रॉकेल बंद करून उज्ज्वल गॅस योजना सुरू केली. पेण तालुक्याच्या ग्रामीण भागासह डोंगर दऱ्यातील आदिवासी बांधवांनीही गॅसला पसंती दिली होती. आठ महिन्यांपासून या गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होत आहे. १५० रुपयांपेक्षा जास्त भाव वाढ झाल्याने महिन्याचे बजेट कोलमडले आहे. सध्या सिलेंडरची किंमत १ हजार २०० पर्यंत पोहचली आहे. याचे पैसे भरताना बऱ्यापैकी दमछाक होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेकांकडून गॅसऐवजी पुन्हा चुलीला प्राधान्य दिले जात आहे. या दोन महिन्यांत गॅस सिलेंडर भरण्याची संख्या ४० टक्क्यांवर आली आहे. गॅसधारकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ग्रामीण भागात नागरिकांच्या घरी गॅसजोडणी असली, तरी महिला चुलीचाच वापर करत आहे.

लाकूडफाट्याकडे मोर्चा
ग्रामीण भागातील महिला लाकूड फाटा आणण्यासाठी पुन्हा पायपीट करू लागले आहे. लाकडांमुळे प्रदूषण होत असून धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे आरोग्य धोक्यात येत असूनही महागाईवर तोडगा म्हणून नाईलाजाने महिलांना चूल पेटवावी लागत आहे.

काही महिन्यांपासून गॅस सिलेंडरचे भाव वारंवार वाढत असल्याने ग्रामीण भागातील कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळेच गॅस सिलेंडर भरण्याकडे ते टाळाटाळ करत आहे. त्याला पर्याय म्हणून महिलांनी चुलीचा वापर सुरू केला आहे. लाकडांच्या धुराचा त्रास जाणवत असला, तरी गॅसच्या किमती सारख्याच वाढत असल्याने नाईलाजास्तव चुलीचा वापर करावा लागत आहे.
- पूनम जाधव, गृहिणी, पेण तलुका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com