विशेष रेल्वे गाड्यांना डहाणूला थांबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष रेल्वे गाड्यांना डहाणूला थांबा
विशेष रेल्वे गाड्यांना डहाणूला थांबा

विशेष रेल्वे गाड्यांना डहाणूला थांबा

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील आदेशापर्यंत डहाणू रोड स्थानकावर मुंबई सेंट्रल-भुसावळ उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९०५१/०९०५२ मुंबई सेंट्रल - भुसावळ विशेष गाडी ७ एप्रिल २०२३ पासून पुढील आदेशापर्यंत डहाणू रोड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल-भुसावळ विशेष गाडीला डहाणू रोड स्थानकावर दोन मिनिटांचा अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ट्रेन क्रमांक ०९०५१ मुंबई सेंट्रल-भुसावळ विशेष एक्स्प्रेस डहाणू रोड स्थानकावर मध्य रात्री ०१.५३ वाजता पोहोचेल आणि ०१.५५ वाजता सुटणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०५२ भुसावळ-मुंबई सेंट्रल विशेष गाडीला ८ एप्रिल २०२३ रोजी भुसावळहून सुटणाऱ्या डहाणू रोड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही गाडी डहाणू रोड स्थानकावर मध्यरात्री २.५५ वाजता पोहोचेल आणि २.४७ वाजता सुटेल.