एनएमएमटी बसच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनएमएमटी बसच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
एनएमएमटी बसच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

एनएमएमटी बसच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : करावे येथून नेरूळ गावच्या दिशेने मोटरसायकलवरून जाणाऱ्या मुलाचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या बाजूला बंद अवस्थेतील रिक्षावर धडकून भरधाव एनएमएमटी बसच्या चाकाखाली आल्याने तो गतप्राण झाला. या अपघातप्रकरणी नेरूळ पोलिसांनी रिक्षाचालक आणि एमनएमएमटी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विवेक शाम पटवा (वय १७, रा. करावे गाव) हा बेलापुरातील महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होता. गुरुवारी (ता. ६) त्याचा शेवटचा पेपर होता. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विवेक हा चुलत भावाची मोटरसायकल घेऊन नेरूळ गाव येथे जात होता. या वेळी त्याची मोटारसायकल नेरूळ जिमखान्याच्या गेटजवळ रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या रिक्षावर धडकली. त्यामुळे तो रस्त्यावर पडल्याने पाठीमागून येणाऱ्या एनएमएमटी बसचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. या अपघातात विवेक गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला.