कल्याण, डोंबिवलीचा विकास करणार

कल्याण, डोंबिवलीचा विकास करणार

कल्याण, ता. ८ (बातमीदार) : कल्याण, डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीतून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडबाबत बायोमायनिंगचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खडकपाड्यापासून उल्हासनगरपर्यंत मेट्रो गेली पाहिजे, यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कल्याण, डोंबिवलीतील रस्ते, विकास प्रकल्प, सुशोभीकरण, रिंग रोड, डोंबिवली-मानकोली पूल यासाठी राज्य सरकार पूर्ण मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

एमसीएचआयचे प्रॉपर्टी एक्झिबिशन कल्याणमध्ये सुरू असून शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. या वेळी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, रवी पाटील, राजन बांदेलकर, मिलिंद चव्हाण, सुनील चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा सरकारने रेडिरेकनर, स्टॅम्प ड्युटीचे पैसे वाढवले नाहीत. ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घर मिळाले पाहिजे, म्हणून विकसकांच्या ज्या काही अडचणी आहेत, त्या देखील सोडवण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

विरोधकांचा समाचार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. जेव्हा तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून समाजसेवा करतोय, असा टोला नाव न घेता आदित्य ठाकरे यांना लगावला. आम्ही दिल्लीला जातो आणि राज्याच्या विकासासाठी विकास निधी आणतो, असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com