Thur, October 5, 2023

दोन मेल-एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त थांबा
दोन मेल-एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त थांबा
Published on : 9 April 2023, 2:02 am
मुंबई, ता. ९ : पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी वलसाड-पुरी एक्स्प्रेस आणि हमसफर एक्स्प्रेसला प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी छत्तीसगडमधील रायगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. १३ एप्रिल २०२३ रोजी वलसाडहून सुटणारी रेल्वे क्रमांक २२९०९ आणि पुरीहून सुटणारी रेल्वे क्रमांक २२९१० ला रायगड स्थानकावर थांबा दिला आहे. तसेच रेल्वे क्रमांक २०९१७ इंदूर-पुरी हमसफर एक्स्प्रेसलाही रायगड रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.