वेतनासाठी शिक्षक परिषद आग्रही

वेतनासाठी शिक्षक परिषद आग्रही

मुंबई, ता. ११ (बातमीदार) ः शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणे अपेक्षित असतानाही अजूनपर्यंत मिळालेले नाही. त्यातच रमजान ईद हा सण जवळ आला आहे. हे लक्षात घेऊन ईदपूर्वी म्हणजेच २० एप्रिलपर्यंत मार्च महिन्याचे वेतन मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री यांना दिले आहे.
शिक्षकांचे मार्चचे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित असतानाही अद्यापही मिळालेले नाही. त्यातच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मोठ्या प्रमाणात आयकराची कपात झाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच २२ एप्रिल रोजी रमजान ईदचा सण येत आहे. पुढे लगेचच दोन मेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी लागत असल्याने अनेक शिक्षक सुट्टी काळात आपल्या गावी जातात. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन २० एप्रिल पूर्वी करण्यात यावे, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेने राज्य सरकारकडे केले आहे.

सकारात्‍मक प्रतिसाद
शिक्षकांच्‍या वेतनाबाबत वित्तमंत्री यांचे सचिव, वित्त उपसचिव तसेच शालेय शिक्षण सचिव यांच्याशी मंत्रालयात शिक्षण परिषदेच्या प्रतिनिधी मंडळाने चर्चा केली. या वेळी २० एप्रिलपूर्वी वेतन देण्याबाबत सर्व संबंधितांनी अनुकूलता दर्शविली आहे, अशी माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे.

वेळेत अनुदान उपलब्ध करून देणे आणि त्याचे वेळेत वाटप होणे अपेक्षित आहे. किमान ईदपूर्वी तरी मार्च महिन्याचे वेतन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळावे, याबाबत आम्ही राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी वेतन २० एप्रिलपूर्वी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
– शिवनाथ दराडे, कार्यवाह, राज्यशिक्षक परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com