घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपीला अटक
घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपीला अटक

घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपीला अटक

sakal_logo
By

अंधेरी, ता. ११ (बातमीदार) ः चार दिवसांपूर्वी जोगेश्‍वरी येथे फ्लॅटचे लॉक तोडून सहा लाखांच्या घरफोडीप्रकरणी निखिल हरपाल सिंग ऊर्फ सुफियान या सराईत गुन्हेगाराला मालवणी येथून आंबोली पोलिसांनी सोमवारी (ता. १०) अटक केली. सुफियानविरुद्ध सांताक्रूज, डी. एन नगर, वर्सोवा, जुहू, अचोले आणि आंबोली पोलिस ठाण्यात बाराहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
चार दिवसांपूर्वी जोगेश्‍वरीतील केवणीपाडा, लिली टॉवरजवळील फातिमा महलमध्ये फ्लॅट क्रमांक ९ मध्ये रॉल्फी लिओ सेराव हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता ते नातेवाईकांकडे गेले होते. या वेळी त्यांच्या घरात कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला होता. कपाटातील साडेदहा तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाखाची रोख रक्कम असा सहा लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला होता. शनिवारी दुपारी तीन वाजता ते घरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी आंबोली पोलिसांना ही माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवला होता. गुन्हा दाखल होताच सोमवारी सुफियानला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे. त्याने अलीकडेच आंबोली आणि डी. एन. नगरमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. सुफियान हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बाराहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला मंगळवारी अंधेरीतील न्‍यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.