नालासोपाऱ्यात ३२ लाखांचे ‘मॅफेड्रॉन’ जप्त

नालासोपाऱ्यात ३२ लाखांचे ‘मॅफेड्रॉन’ जप्त

नालासोपारा, ता. १३ (बातमीदार) : नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर येथे एका नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३२ लाखांचे १६० ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात अमली पदार्थविरोधी पथकाला यश आले आहे. इबे ईवे ऊर्फ चिमा मोजेस (३७) असे अटकेतील नायजेरियन व्यक्तीचे नाव आहे. नालासोपारा अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक अमर मराठे बुधवारी (ता. १२) नालासोपारा परिसरात पथकासह गस्त घालत असताना एक संशयित नायजेरियन उभा असलेला दिसला. पथकाने त्याची चौकशी केली असता त्याने थेट पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करत पळ काढला; परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मॅफेड्रॉन आढळले. याप्रकरणी तुळिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com