
मुंबई ते बनारस दरम्यान १८ विशेष रेल्वे
मुंबई, ता. १४ : उन्हाळी सुटीत बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते बनारस दरम्यान १८ विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्र. ०९१८३ मुंबई सेंट्रल-बनारस विशेष एक्स्प्रेस ३ मे ते २८ जून दरम्यान दर बुधवारी रात्री १०.५०ला सुटून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता बनारसला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्र. ०९१८४ बनारस-मुंबई सेट्रल विशेष एक्स्प्रेस ५ मे ते ३० जूनपर्यंत दर शुक्रवारी दुपारी २.३०ला सुटून मुंबई सेंट्रलला रविवारी पहाटे ४.३५ला पोहोचणार आहे. या दोन्ही विशेष एक्स्प्रेस बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, भरतपूर, अछनेरा जंक्शन, आग्रा फोर्ट, तुंडला, शिकोहाबाद, मैनपुरी येथे थांबेल. या एक्स्प्रेसला भोनगाव, फर्रुखाबाद, कन्नौज, कानपूर सेंट्रल, लखनौ, रायबरेली जंक्शन, अमेठी, प्रतापगड, जंघाई जंक्शन आणि भदोही स्थानकातही थांबा दिला आहे.