कल्याण डोंबिवलीत आंबेडकर जयंती

कल्याण डोंबिवलीत आंबेडकर जयंती

कल्याण, ता. १५ (बातमीदार) ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीदिनानिमित्त कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी महापालिका मुख्यालयात आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे, उपायुक्त वंदना गुळवे, अतुल पाटील, धैर्यशील जाधव, महापालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, घनश्याम नवांगुळ, शैलेश कुलकर्णी, माजी महापौर रमेश जाधव, माजी पालिका सदस्य रेखा जाधव, प्रशासन अधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, विधी अधिकारी आनंद सूर्यवंशी, सहायक आयुक्त तुषार सोनवणे, राजेश सावंत, हेमा मुंबरकर, दिनेश वाघचौरे, सहायक सुरक्षा अधिकारी किसन जाधव इतर अधिकारी/ कर्मचारीवर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेच्या डोंबिवली विभागातही अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी डोंबिवली कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि डोंबिवली विभागीय कार्यालयातील आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी परिमंडळ २ च्या उपआयुक्त स्वाती देशपांडे, सहायक आयुक्त भरत पाटील, संजय साबळे इतर अधिकारी/ कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com