Tue, Sept 26, 2023

जीवनदीप महाविद्यालयात जयंती
जीवनदीप महाविद्यालयात जयंती
Published on : 15 April 2023, 10:28 am
खर्डी, ता. १५ (बातमीदार) : खर्डी येथील जीवनदीप महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने संतोष साबळे, दीपक विशे आणि विशाल भोसले यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेबांची पत्रकारिता, राजकारण, अर्थकारण, भारतीय संविधान याविषयी संतोष साबळे यांनी; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत कसे होते, याविषयी दीपक विशे यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विशाल भोसले यांनीही मार्गदर्शन केले. रोहित मरडे व पल्लवी ठाकूर या विद्यार्थ्यांनी भाषण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती मोरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रियांका पवार यांनी मानले.