घाटकोपरमध्ये बाबासाहेबांना अभिवादन करणारी मिरवणूक

घाटकोपरमध्ये बाबासाहेबांना अभिवादन करणारी मिरवणूक

घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) ः भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात पार पडली. जयंतीचे औचित्य साधत घाटकोपर पश्चिमेतील भीमनगर परिसरात महिला व युवतींनी १३२ आकर्षक रांगोळ्या काढून संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता. भीमनगरच्या दीड किमी रस्त्यावर या विविध रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दिवसभरात विविध सामाजिक उपक्रम देखील घेण्यात आले.
अखिल भीमनगर एकता आणि उत्कर्ष समिती यांच्या वतीने यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व रथ सजवण्यात आला होता. या वेळी मिरवणुकीची सुरुवात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना वंदन करून सुरू करण्यात आली. या वेळी अखिल भीमनगर एकता आणि उत्कर्ष समितीचे अध्यक्ष शरद भावे, सेक्रेटरी नाना अहिरे, खजिनदार संतोष खरात, सल्लागार विजय गोरे, शांताराम हाटे, अशोक जाधव, समाजसेवक संदेश बल्लाळ आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मिरवणूक भीमनगर मार्गे घाटकोपर अंधेरी लिंक रोड, सर्वोदय, स्टेशन रोड, एम. जी. रोड ते पवार चाळ अशी काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिला, पुरुषासह युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com