Tue, October 3, 2023

जव्हारमध्ये डॉ. बाबासाहेबांना मानवंदना
जव्हारमध्ये डॉ. बाबासाहेबांना मानवंदना
Published on : 15 April 2023, 11:10 am
जव्हार, ता. १५ (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती महोत्सवाचे आयोजन जव्हार नगर परिषदेच्या विद्यमाने करण्यात आले होते. पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बाबासाहेबांना वंदन करून आदरांजली वाहिली. आमदार सुनील भुसारा, प्रमुख पाहुणे कॅप्टन विनीत मुकणे यांनीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. या वेळी वक्ते म्हणून दिल्ली येथील चाणक्य आयएएस अकादमीचे अजय सहा व नंदन राहाणे यांनी बाबासाहेबांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. या वेळी उत्सव समितीचे सभापती राजू धात्रक, कार्याध्यक्ष चित्रांगन घोलप, सागर बल्लाळ, संदीप मुकणे, शरद मुकणे, गोविंद बल्लाळ आदी उपस्थित होते.